जयपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी झुंझुनूला जाणाऱ्या पोलिसांच्या कारची ट्रकला धडक बसून सहा पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 पोलीस जखमी झाला. हा अपघात चुरू जिल्ह्यातील सुजानगढ सदर पोलीस स्टेशन परिसरात घडला.
झुंझुनू येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्तावर असलेल्या नागौरच्या खिनवसार पोलीस स्टेशनचे 7 पोलीस झायलो कारने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील सुजनगड येथे आज पहाटे कानुटा पोलीस चौकीजवळ त्यांची कार एका ट्रकला धडकली. खिंवसर पोलिस स्टेशनचे एएसआय रामचंद्र, कॉन्स्टेबल कुंभारम, सुरेश मीना, थानाराम आणि महिला पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल महेंद्र अशी या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या पोलिसांची नावे आहेत. सुजानगढचे डीएसपी शकील अहमद यांनी सांगितले की, पोलिसांच्या कारसमोर अचानक गाय आली. या गायीला वाचवण्याच्या नादात ही कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
पंतप्रधानांच्या बंदोबस्तावरील सहा पोलिसांचा अपघाती मृत्यू
