पंढरपूर- आषाढी एकादशी निमित्त पंढरीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसत आहे.त्यातच सर्वसामान्य तासनतास रांगेत उभे असताना व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत काहीजण घुसखोरी करीत होते.मात्र आता विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शन प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे.त्यामुळे रांगेतील हजारो भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसत आहे.
व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेण्यासाठी आता कमी कालावधी लागत आहे. प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दर्शनाची सेवाही २४ तास उपलब्ध केली आहे.