पंढरपूर – पंढरपूर ते टेंभुर्णी या मार्गावरील भटुंबरे गावाजवळ आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास भाविकांच्या खासगी बसचा आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ७-८ प्रवासी जखमी आहेत. जखमींवर पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करून प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. पोलीस तपास करत असून हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.