मुंबई – एसटी महामंडळाने पंढरपूरमध्ये राज्यातील पहिले यात्रा बस स्थानक उभारले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीच्या ११ हेक्टर जागेवर हे ३४ फलाटांचे प्रशस्त असे बस स्थानक आणि त्याच्यालगत एक हजार भाविक क्षमतेचे यात्री निवास उभारण्यात आले आहे.पंढरपूरमध्ये एसटी महामंडळाचे अद्ययावत बस स्थानक आहे. या स्थानकातून दररोज शेकडो गाड्या राज्यभरात प्रवाशांची ने-आण करीत असतात.मात्र आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात येतात. त्यावेळी हे बस स्थानक अपुरे पडते. त्यामुळे हे नवीन प्रशस्त असे यात्रा बस स्थानक बांधण्यात आले आहे.

 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								







