परभणी- हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ते परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ही माहिती देत डख यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी मला निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभभेत मांडण्यासाठी मी लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते आणि मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. मी त्यांच्यासोबत परभणीतून लोकसभा लढविण्याबाबत चर्चा करणार आहे.’