न्यू नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी
तिसऱ्या महायुद्धात चीनचे तुकडे?

लंडन: न्यू नॉस्ट्राडेमस या नावाने प्रसिद्ध असलेल्या क्रेग हॅमिल्टन पार्करने एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. क्रेगच्या अंदाजानुसार, 2023 या वर्षात जगाला तिसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागणार आहे. एका विमान अपघाताचे निमित्त होईल आणि तिसरे महायुद्ध सुरू होईल असे तो म्हणतो. या युद्धात चीनचे अनेक तुकडे होतील अशी भविष्यवाणी केली आहे. क्रेग हॅमिल्टन याने ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती. त्यानंतरच क्रेगला नवीन नॉस्ट्रॅडॅमस म्हटले जाऊ लागले.

क्रेग हॅमिल्टन भविष्यातील तिसर्‍या महायुद्धासाठी रशिया आणि युक्रेनला जबाबदार ठरवत नाही. तर चीन-तैवानला जबाबदार धरतो. तैवानमध्ये एका विमान अपघाताची घटना घडेल आणि त्यामुळे तिसर्‍या महायुद्धाची सुरुवात होईल असा अंदाज त्याने वर्तवला आहे. दोन पाणबुड्यांची किंवा दोन विमानांची टक्कर होईल आणि जगासमोर हे संकट उभे ठाकेल असे तो म्हणतो. या घटनेमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा संघर्ष निर्माण होईल, असे त्याने म्हटले आहे. चीन-तैवानचा संघर्ष यावर्षी अधिक गंभीर रूप धारण करणार असल्याचे क्रेग हॅमिल्टन म्हणत आहे.

फ्रान्सचा जगप्रसिध्द भविष्यवेता नॉस्ट्रॅडॅमसने 2023 साली मोठे युद्ध होणार असल्याचे त्याच्या भविष्यवाणीत म्हटले आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 1555 मध्ये त्याच्या भविष्यवाण्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, सात महिन्यांचे मोठे युद्ध होणार आणि त्यामध्ये कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडणार.

Scroll to Top