ऑकलंड
न्यूझीलंडच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या ऑकलंड बेटांजवळ आज ६.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३३ किमी (२१ मैल) खाली होता. भूकंपाच्या केंद्राजवळील सर्वात जवळचे प्रमुख शहर असलेल्या इनव्हरकार्गिलच्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, येथे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पायाभूत सुविधांचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि तात्काळ त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
दरम्यान, २० मे रोजी फ्रान्सच्या न्यू कॅलेडोनिया भागात ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, तर १९ मे रोजी न्यू कॅलेडोनिया प्रदेशात ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. रावळपिंडी, कराची आणि अफगाणिस्तानच्या अनेक भागांसह भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी मोजण्यात आली. हरियाणा, पंजाब आणि काश्मीरसह भारतातील अनेक भागातही त्याचा प्रभाव दिसून आला.