काठमांडू – नेपाळमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी झालेल्या भुस्खलनाच्या घटनांमध्ये १४ जणांचा बळी गेला आहे. या पावसाने शहरी भागाचे जनजीवन ठप्प झाले असून अनेक मार्गही बंद झाले आहेत. डोंगरावरुन वाहणाऱ्या पाण्याच्या लोढ्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.नेपाळमधील पावसाने अनेकजण बेपत्ता झाले असून आपत्ती व्यवस्थापन दल त्यांचा शोध घेत आहे. पूरस्थितीत अडकलेल्यांच्या मदतीसाठी जागोजागी मदत छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या लोकांना शोधणे व त्यांना सुरक्षित ठेवणे याला आमचे प्राधान्य आहे असे नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते दान बहादूर कारकी यांनी म्हटले आहे.
नेपाळमध्ये पावसामुळे१४ जणांचा बळी
