काठमांडू – नेपाळसारख्या छोटेखानी देशातही आता समलैंगिकतेचे वारे वाहू लागले आहेत. नेपाळमध्ये देशातील पहिल्या वहिल्या लेस्बियन विवाहाची अधिकृतपणे सरकार दफ्तरी नोंदणी झाली आहे. अंजू देवी श्रेष्ठा ऊर्फ दिप्ती आणि सुप्रिता गुरुंग अशी लेस्बियन विवाह करणार्या तरुणींची नावे आहेत. अंजू देवी ही पश्चिम नेपाळच्या बर्दिया जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर सुप्रिता ही सियांग्जा जिल्ह्यातील रहिवासी आहे. एकमेकाच्या प्रेमात पडलेल्या या दोन मैत्रिणींनी रविवारी बर्दिया जिल्ह्यातील जमुना ग्रामीण नगरपालिकेत विवाहाची अधिकृतपणे नोंदणी केली. या दोघींचे वय ३३ वर्षे आहे.नेपाळ पहिल्या लेस्बियन विवाहाची नोंदणी करून त्यांनी इतिहास रचला आहे.वॉर्ड सचिव दीपक नेपाल यांनी या विवाहाची नोंदणी करून त्यांना रितसर मॅरेज सर्टिफिकेट दिले आहे,अशी माहिती सुनील बाबू पंटा यांनी दिली. पंटा हे स्वतः समलिंगी असून ते नेपाळच्या संसदेतील माजी सदस्य आहेत. नेपाळच नव्हे तर दक्षिण आशियाई देशांमध्ये अशा प्रकारे लिस्बियन विवाहाची अधिकृतपणे नोंदणी होण्याची ही पहिलीच घटना ठरावी,असा दावा पंटा यांनी केला आहे. समलिंगींच्या हक्कासाठी लढणाऱ्या मयाको पहिचान नेपाल या संस्थेने या लेस्बियन विवाह नोंदणीवर आनंद व्यक्त केला आहे.सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करून संस्थेने या लेस्बियन विवाहाची माहिती दिली.