काठमांडू:
नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू बाजुरा येथील डहाकोट असल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ आणि ५.९ इतकी असल्याचे सांगण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहिला भूकंप रात्री ११.५८ वाजता झाला, त्याची तीव्रता ४.९ इतकी होती. यानंतर दीड वाजता ५.९ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप नोंदवला गेला. नेपाळच्या सुर्खेत जिल्ह्यातील भूकंप विज्ञान केंद्राचे अधिकारी राजेश शर्मा यांनी सांगितले की, दीड तासाच्या अंतराने भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर घराबाहेर पडले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यापूर्वी १ एप्रिल रोजी दोलखा जिल्ह्यातील सुरी येथे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. येथील नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, काठमांडूपासून १८० किमी पूर्वेला डोलखा येथे सकाळी ११.२७ वाजता ५.२ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. ओखलढुंगा, रामेछाप, सिंधुपाल चौक आणि नुवाकोट जिल्ह्यात तसेच काठमांडू खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.