नवी दिल्ली – भारताचा अव्वल भालाफेकपट्टू आणि टोकिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने फिनलॅन्ड येथे १३ जून रोजी होणार्या पावो नुर्मी स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. ही स्पर्धा फिनलॅन्डमधील तुर्कू येथे होणार आहे.गेल्या महिन्यात मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे आता नीरजने ही माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.
या स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धकांची अद्ययावत यादी शुक्रवारी स्पर्धेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली.त्यावेळी त्यात त्याचे नाव नव्हते. नीरजने स्वतःच प्रकृतीच्या कारणास्तव आपण या जागतिक अथलेटिमॅक्स कॉन्टिनेन्टल टूर गोल्ड दर्जा असलेल्या या स्पर्धेतून माघार घेतल्याचे कळवले आहे.त्याच्या व्यवस्थापनाने तसे स्पर्धेच्या संयोजकांना सांगितले आहे. ५ मे रोजी महिन्यात दोहा डायमंड लीग जिंकून सीझनची सुरुवात करणाऱ्या नीरज चोप्राने ४ जून रोजी नेदरलँड्समध्ये झालेल्या एफबीके गेम्समध्येही भाग घेतला नव्हता.त्यावेळी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की, सरावावेळी मांडीचे स्नायू दुखावले गेल्याने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही. तसेच वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मी पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी काही स्पर्धेतही भाग घेणार नसून जूनमध्ये पुन्हा मी पूर्ववत खेळण्यास सज्ज असेन.
नीरज चोप्राची फिनलॅन्ड पावो नुर्मी स्पर्धेतून माघार ! भारताला धक्का
