Home / News / ‘नीट-यूजी’ परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर! टॉपर्स घसरले

‘नीट-यूजी’ परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर! टॉपर्स घसरले

नवी दिल्ली- एनटीए म्हणजेच ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने काल शुक्रवारी ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर केले. या निकालात पैकीच्या पैकी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- एनटीए म्हणजेच ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने काल शुक्रवारी ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर केले. या निकालात पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या टॉपर्स विद्यार्थ्यांची संख्या ६१ वरून घसरून १७ पर्यंत खाली आली आहे.गुणवंतांच्या यादीतील पहिल्या १०० पैकी १७ जणांना ७२० पैकी ७२०, सहा जणांना ७१६ आणि ७७ जणांना ७१५ गुण मिळाले आहेत.

‘नीट-यूजी’ परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाले होते.त्यापैकी ४४ विद्यार्थ्यांना उपरोक्त प्रश्नासाठी संपूर्ण गुण मिळाले होते. नंतर वेळेच्या कारणावरून दिलेले वाढीव गुण मागे घेण्यात आल्यानंतर पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ झाली. पदार्थविज्ञान विषयाच्या वादात सापडलेल्या प्रश्नात संपूर्ण गुण मिळालेल्या ४४ विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्यात आले. त्यामुळे आता केवळ १७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.सुधारित यादीनुसार आधी तिसऱ्या क्रमांकावर असलेला दिल्लीचा एक विद्यार्थी पहिल्या तर चौथ्या क्रमांकावर असलेला उत्तर प्रदेशचा एक विद्यार्थी दुसऱ्या स्थानावर आहे. तर, परीक्षेत ७२० पैकी ७२० मिळालेला महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचे गुण कमी होऊन तो आता २५ व्या स्थानावर घसरला आहे. याचप्रमाणे तमिळनाडूच्या एक विद्यार्थी आधी दुसऱ्या क्रमांकावर होता तो आता २६ व्या स्थानी आहे

Web Title:
संबंधित बातम्या