नीट प्रश्नपत्रिका ऑनलाईन देण्याची समितीची शिफारस

नवी दिल्ली – नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन देण्यात याव्यात. मात्र उत्तरपत्रिका ऑफलाईन घ्याव्यात अशी शिफारस नीट परीक्षेतील गोंधळ दूर करण्यासाठी नेमलेल्या के राधाकृष्णन समितीने सरकारकडे केली आहे.नीट परीक्षा ज्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेतली जाते त्या संस्थेवर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. कंत्राटी कर्मचारी ठेवू नयेत,अशी महत्वपूर्ण शिफारसही समितीने केली आहे. कंत्राटी कामगार असतील तर त्यांची जबाबदारी कमी राहते , त्यामुळे कायमस्वरूपी कामगारच असावे असे समितीचे म्हणणे आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top