नवी दिल्ली – येत्या रविवारी ११ ऑगस्ट रोजी होणार असलेली नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.विशाल सोरेन नावाच्या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी केंद्रे नेमून देण्यात आली आहेत जिथे बहुतांश विद्यार्थ्यांना पोहोचणे अवघड जाणार आहे. त्यामुळे केंद्राची फेररचना करावी आणि तोपर्यंत रविवारी होणारी ही परीक्षा पुढे ढकलावी,अशी मागणी सोरेन याने केली आहे.परिक्षेस देण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांच्या चार संचांची रचना कशी असणार आहे याचे सूत्रही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच सांगितले जाणार आहे. त्यामुळे आपल्या शहरापासून लांबच्या शहरातील परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकांचे सूत्र समजून घेणे विद्यार्थ्यांना अवघड जाईल,असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची उद्या सुनावणी आहे .