नवी दिल्ली – देशातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य केल्याबद्दल संसदीय समिती मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना व त्यांच्या मेटा कंपनीला समन्स बजावणार आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी १० जानेवारी रोजी जो रोगन या पॉडकास्टमध्ये भारताच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, कोविडनंतर अनेक देशांची सरकारे पडली. यावरून जनतेचा सरकारवर असलेला अविश्वास दिसून येतो.सरकारचा पराभव हे दाखवतो की कोविड महामारीनंतर लोकांचा विश्वास कमी झालेला आहे. वाढती महागाई, साथीच्या आजाराशी संबंधित आर्थिक धोरणे आणि सरकारचे कोविड १९ प्रकरणाची हाताळणी यामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे. भारतात मोदी सरकारचा पराभव झाला.
या त्यांच्या वक्तव्यामुळे देशाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतातील २०२४ च्या निवडणुकीत ६४ कोटी लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर लोकांनी विश्वास दाखवला आहे. झुकरबर्ग यांचा दावा चुकीचा आहे. याबाबत भाजपाचे खासदार आणि कम्युनिकेशन-माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनीही म्हटले की, माझी कमिटी मेटाला बोलावणार असून त्यांना माफी मागायला सांगणार आहे. या चर्चेनंतर एक्सवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत.