बंगळुरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला अजून एक महिना शिल्लक आहे, पण त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद पेटला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याने आतापासूनच त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. विधिमंडळात आपापल्या समर्थकांची संख्या वाढावी यासाठी आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी दोघांमध्ये जबरदस्त चुरस होती .
येत्या १० मी रोजी कर्नाटक मध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने आपली सत्ता राखण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासूनच निवडणुकीची तयारी केलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र भाजपातील नाराजांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपातील काही फुटीरांना स्थान मिळाले आहे . आणि नेतेही सिद्धरामय्या आणि शिकुमार यांच्यात चढाओढ लागलेली होती. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्ष असल्याने भाजप तसेच देवेगौडांच्या पक्षातील बरेचसे फुटीर शिवकुमार यांच्या गळाला लागले तर काहींना सिद्धरामय्यांनी तिकीट मिळवून दिले. दोन्ही नेते काँग्रेस पक्षात आपापला गट बळकट करून आपल्या गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यासाठी धडपड करीत आहेत. मागील वेळेस काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यावेळेसही तसेच यश मिळेल असा दावा सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी केला आहे.