*अंत्योदय शिधापत्रिका
असणार्यांनाच लाभ
मुंबई- राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून विविध योजनांची खैरात सुरू केली आहे.यंदा रेशन दुकानामध्ये
अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी दिली जाणार आहे.राज्य वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली एक साडी प्रति कुटुंबाला भेट देण्याच्या योजनेला राज्य १ सरकारने मान्यता दिली आहे.यासाठी तब्बल ९६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात नवरात्रीनिमित्त महिलांना मोफत साडी वाटप केले होते. त्यावेळी या साड्या गावकर्यांनी जाळल्याचा प्रकार घडला होता.मोफत साडीचा महिलांकडून असा निषेध होत असताना आता सरकारच मोफत साडी वाटप करणार आहे. राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार,अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब प्रतिवर्षी एक साडी भेट दिली जाणार आहे. महायुती सरकारने राज्यात कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित नवी मुंबई ही नोडल संस्था नेमण्यात आली आहे.