अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच कालव्यांची कामेसुद्धा पूर्ण झाली असून दुष्काळी भागाला लवकरच पाणी मिळणार आहे. ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी केली जाणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी कालव्यांच्या कामाची पाहणी करत ही घोषणा केली आहे.
अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणी कोपरगावसह नाशिक जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम २०११ साली पूर्ण झाले होते. त्यानंतर धरणात पाणीही साठवायला सुरूवात झाली. मात्र ज्या दुष्काळी भागासाठी धरण आणि कालवे बांधण्यात आले. त्यांना अजून एक थेंबही पाणी पोहचले नव्हते. मात्र धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून ३१ मे रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार आहे.