मुंबई – माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. ते २३ ऑक्टोबरला निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांची कुडाळ- मालवण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. परंतु, महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. कुडाळ- मालवण मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी राणे पिता पुत्रांनी भाजपा नेत्यांकडे आग्रह धरला आहे. परंतु, एकनाथ शिंदेंची शिवसेना या जागेवरील आपला दावा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर निलेश राणे हे कुडाळ- मालवण मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरु झाली असून त्यांची शिवसेनेतील प्रवेशाची २३ नोव्हेंबर ही तारीख ठरल्याची माहिती आहे.
निलेश राणेंचा शिंदे गट प्रवेश २३ ऑक्टोबरला
