सातारा – अमेरिकेत अपघात झालेल्या निलम शिंदेच्या कुटुंबीयांना अखेर अमेरिकन दूतावासाने तातडीचा व्हिसा मंजूर केला आहे. १४ फेब्रुवारीला कॅलिफोर्नियामध्ये एका वाहनाच्या धडकेमुळे निलम गंभीर जखमी झाली होती. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
निलमच्या अपघातानंतर ४८ तासांनी तिच्या कुटुंबाने व्हिसासाठी अर्ज केला होता पण त्यांना व्हिसा मिळत नव्हता. या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच, सरकारने तातडीने मध्यस्थी केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे एक्स पोस्टद्वारे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने काल अमेरिकेकडे व्हिसासाठी विशेष विनंती केली होती. आज निलमच्या वडील, चुलत भाऊ आणि काकांचा व्हिसा मंजूर झाला असून, ते लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत.
नीलमचा चुलत भाऊ गौरव म्हणाला की, आम्हाला व्हिसा इतक्या सहजासहजी मिळाला नसता. पण देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे यांच्या मदतीमुळे आज आम्हाला व्हिसा मिळाला आहे. नीलमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या दोन्ही पायांमधून अतिरक्तस्राव झाला. रक्तस्राव थांबला आहे.
निलम शिंदेंच्या कुटुंबीयांना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मंजूर
