निर्माते, दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन

पुणे -राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक दत्तात्रय वाघ यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.अभिनेते मिलिंद शिंत्रे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत वाघ यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वाघ यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता.विवेक वाघ यांनी महाविद्यालयीन काळात पुरुषोत्तम करंडक जिंकला होता. त्यांनी ‘नकळत सारे घडले’ या नाटकाची निर्मिती केली होती. ‘सिद्धांत’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. ‘शाळा’ या चित्रपटाची निर्मिती विवेक वाघ यांनी केली होती; तसेच ‘फँड्री’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ‘कातळशिल्प’ या विषयावरही त्यांनी शोध माहितीपट साकारला होता.विवेक वाघ यांनी दिग्दर्शित केलेल्या जक्कल या मराठी माहितीपटाला ‘सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टगेटिव्ह चित्रपट’ या कॅटेगरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पुण्यात सत्तरीच्या दशकात घडलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर हा चित्रपट आधारित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top