कराची – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांची नात फातिमा भुट्टो हिने लग्नानंतर हिंदूंच्या महादेव मंदिराला भेट दिली. फातिमाच्या या कृतीने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. काही नेटकर्यांनी फातिमा यांचे खूप कौतुक केले, तर काहीजणांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
फातिमा या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची भाची आणि मुर्तजा भुट्टो यांच्या कन्या आहेत. त्या व्यवसायाने लेखिका आणि स्तंभलेखक आहेत. त्यांनी शुक्रवारी ग्रॅहम बायरा यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर रविवारी फातिमा पतीसोबत कराचीतील ऐतिहासिक महादेव मंदिरात दर्शनासाठी गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत जुल्फिकार अली भुट्टो ज्युनियर आणि हिंदू नेतेही उपस्थित होते. मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन त्यांनी पिंडीवर दूध अर्पण केले. फातिमा आणि तिच्या पतीच्या या कृतीवर सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. दरम्यान, फातिमा यांचे पती ग्रॅहम हे ख्रिश्चन असून ते अमेरिकन नागरिक आहेत.
निकाह झाल्यानंतर फातिमा भुट्टो यांनी हिंदू मंदिराला भेट दिली
