वॉशिंग्टन – नासाच्या एका यानाने सूर्याच्या सर्वात जवळ जाऊन इतिहास रचला आहे, जो आतापर्यंत कोणत्याही अंतराळ यानाने केला नाही.नासाच्या या यानाने काल ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला तीव्र उष्णतेचा सामना करत सूर्यापासून केवळ ६१ लाख किलोमीटर अंतरावर उड्डाण केले.स्पेस डॉट कॉम नुसार, अमेरिकन वेळेनुसार काल सकाळी ६.५३ वाजता आणि भारतीय वेळेनुसार काल सायंकाळी ५.२३ वाजता हे अंतराळयान सूर्याच्या पृष्ठभगाच्या सर्वात जवळून गेले.
सूर्याच्या इतक्या जवळ जाऊन पार्कर सोलर प्रोबने स्वतःचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे. मागील कोणत्याही मोहिमेपेक्षा ते सातपट सूर्याच्या जवळ आले आहे. सोलर प्रोबने सूर्याच्या किमान दोन फ्लायबाय बनवण्याची अपेक्षा आहे,परंतु हे आतापर्यंत आलेले सर्वात जवळ आहे. आता हे यान भस्मसात झाले की नाही, याची माहिती २८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता मिळू शकेल. दरम्यान,नासाचे अंतराळयान ६,९२,०१७ मैल प्रतितास या वेगाने प्रवास करते. त्यामुळे ते आतापर्यंतची सर्वात वेगवान मानवनिर्मित वस्तू ठरले आहे.पार्कर प्रोबला सूर्याच्या कोरोनाबद्दल डेटा गोळा करण्यासाठी १,८०० अंश फॅरन हाइट म्हणजेच ९८० अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला.