फ्लोरिडा – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने गुरु ग्रहाचा चंद्र युरोपाच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले.युरोपा क्लिपर नावाचे हे यान फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन या हेवी रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे.
गुरुचा चंद्र युरोपाच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली गोठलेल्या अवस्थेतील महासागर असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटत आहे. त्या अनुषंगाने युरोपावर जीवसृष्टी आहे किंवा कधी काळी अस्तित्वात होती का, याचा शोध घेण्यासाठी नासाने ही मोहीम हाती घेतली आहे.
ही मोहीम सहा वर्षे चालणार आहे.या दरम्यान युरोपा क्लिपर यान ३ अब्ज किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.११ एप्रिल २०३० रोजी हे यान गुरुच्या कक्षेत प्रवेश करेल.त्यानंतर युरोपाभोवती प्रदक्षिणा घालत युरोपाचा अभ्यास करणार आहे.