नाशिक –
नाशिकमध्ये शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनवरील सब स्टेशनच्या विद्युत कामासाठी शनिवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे.
वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी पाणीपूरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा हाेईल असे पालिकेने म्हटले आहे.