नाशिकामधील कामगार नेत्याच्या मुलाचा कझाकिस्तानामध्ये मृत्यू

नाशिक – नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे (आयएसपी) प्रेस कामगार नेते आणि वर्क्स कमिटीचे सदस्य डॉ. चंद्रकांत हिंगमिरे यांच्या मुलाचा कझाकिस्तानमधील इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कामगार आणि सातपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओंकार हिंगमिरे असे त्याचे नाव आहे.

ओंकार कझाकिस्तानमध्ये एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. कॉलेजजवळच एका इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर आपल्या मित्रांसह ओंकार राहत होता. २६ एप्रिलला लागलेल्या चौथ्या वर्षाच्या निकालात तो प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला होता. काही दिवसांनी सुट्टी लागणार असल्याने ७ जून रोजी तो नाशिकला घरी येणार होता. त्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. मात्र, ५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास राहात असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून ओंकारचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कामगार नेते जगदीश गोडसे आणि ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ओंकार यांचा मृतदेह आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला. गोडसेंनी कझाकिस्तानमधील राजदूताबरोबर पत्रव्यवहार केला आहे. डॉ. हिंगमिरे यांचा मोठा मुलगा यश हा लंडन येथे एमएसचे शिक्षण घेत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top