नाशिक – नाशिकसह धुळे, पालघर, नंदूरबार आणि बुलढाण्यात काल मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तेथील शेतकरी आता प्रचंड चिंतेत पडले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद परिसरात मध्यरात्री पावसाच्या सरी बरसला तर नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण तालुक्यासह ग्रामीण भागात पहाटे काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पिकावर रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे. पालघर जिल्ह्याच्या पूर्वेच्या विक्रमगड, वाड्यासह काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तुर, हरभरा, वाल पिकाची काढणीला असताना अवकाळी पाऊस कोसळ्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. तसेच वीटभट्टी मालकांचीही दाणादाण उडाली आहे. आंबा बगायतदारांचेही यामध्ये मोठं नुकसान झालं आहे.
8 मार्चपर्यंत गारपीटीसह
अवकाळी पावसाचा अंदाज
राज्यात 8 मार्चपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसासह जोरदार गारपीट होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघरमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे.
नाशिकसह धुळे, पालघर आणि