नाशिक – नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे तसेच गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीची कामे हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुवठा बंद ठेवला जाणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. याबाबतची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महापालिकेने केले आहे.
नाशिक शहाराला प्रामुख्याने गंगापूर धरण समूह, मुकणे व काही प्रमाणात दारणा धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी गंगापूर धरण तसेच मुकणे धरण येथे महापालिकेने पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. मुकणे राॅ वाॅटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील सबस्टेशनमधील दुरुस्ती कामे तसेच ३३ केव्ही क्षमतेच्या उपकरणांची तपासणी केली जाणार आहे.त्यामुळे संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा होणार नाही.