नाशिकच्या महापालिका शाळेतील शिक्षकांना ड्रेसकोड, मोबाईल बंदी

नाशिक- नाशिक महापालिकेने गेल्या वर्षी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ड्रेसकोड लागू केला होता.आता या विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू केला जाणार आहे. शिक्षकांना पांढरा शर्ट,काळी पॅन्ट,तर महिला शिक्षकांना पांढरी साडी असा ड्रेसकोड असेल. त्याचप्रमाणे या शिक्षकांना शाळेत मोबाईल बंदी घातली जाणार आहे. ड्रेसकोडबाबत लवकरच अंतिम सूचना जारी केली जाईल, असे पालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांनी सांगितले.

या पालिकेच्या शिक्षण विभागाने नुकतेच ७० स्मार्ट शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक स्मार्ट शाळा सुरू झाली असून तेथील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहे. स्मार्ट शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञान प्रणाली डिजिटल व मल्टिमीडिया सामग्री, सर्वांगीण विद्यार्थी विकास भौतिक सुविधा या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांमधील ८०० शिक्षकांना स्मार्ट शिक्षण घेण्याचे धडे दिले जात आहे. हे शिक्षकदेखील स्मार्ट असावेत म्हणून त्यांना आता ड्रेसकोड दिला जाणार आहे.
शिक्षकांना पांढरा शर्ट व काळी पॅन्ट, तसेच महिला शिक्षकांना पांढरी साडी असा ड्रेसकोड देण्याचा विचार सुरू आहे. तसेच शाळेत शिकवत असताना शिक्षकांना शाळांमध्ये मोबाईल वापरता येणार नाही, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. शाळांमध्ये अचानक पाहणी करून वर्ग सुरू असताना शिक्षकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top