नाशिक -धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील पाचही दानपेट्या सील करा,असा आदेश न्यायालयाने दिला आहे.या आदेशामुळे खळबळ उडाली आहे.
श्री कपालेश्वर महादेव मंदिरात गुरव समाजाने मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या पैशांचा नेमका उपयोग कसा होतो, रोज किती पैसे जमा होतात याचे कोणतेही ऑडिट अनेक वर्षांपासून झालेले नाही,असा आरोप कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून दोन- तीन दिवसांपूर्वीच करण्यात आला होता.या दानपेटीतील रकमेवरून गुरव समाजात मोठा वादही झाला होता. भाविक अर्जदाराने या दानपेटीबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा आधार घेत न्यायालयाने धर्मदाय आयुक्तांना मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत या दानपेट्यांमधील जमा रकमेबाबतचा अधिकार धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे राहण्याची शक्यता आहे.