Home / News / नालासोपारा शस्रसाठा प्रकरण! तिघा आरोपींना जामीन मंजूर

नालासोपारा शस्रसाठा प्रकरण! तिघा आरोपींना जामीन मंजूर

मुंबई – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील तिघा आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला.सत्र न्यायालायाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. बाविस्कर यांनी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील तिघा आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला.सत्र न्यायालायाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. बाविस्कर यांनी आरोपींनी पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल उधळून लावण्याचा कट रचल्याचे निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करत आरोपी शरद कळसकर, अमोल काळे आणि ऋषिकेश देवडीकर या तिघांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.

पुण्यात २६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत आयोजित केलेल्या सनबर्न फेस्टिवलमध्ये हल्ल्याचा कट रचल्याचा आरोपावरून एटीएसने ऑगस्ट २०१८ मध्ये आरोपी शरद कळसकर, अमोल काळे आणि ऋषिकेश देवडीकर एकूण १४ जणांना अटक केली होती.अटकेत असलेल्या आरोपी शरद कळसकर, अमोल काळे आणि ऋषिकेश देवडीकर यांनी ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. बाविस्कर समोर सुनावणी झाली. आरोपींच्या कोणत्याही कृत्याने देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला कुठल्याही प्रकारे धक्का बसल्याचे दाखवून देणारे पुरावे नाहीत. तसेच अन्य आरोपीचा प्रसिद्ध व्यक्तींच्या हत्या प्रकरणात सहभाग असला तरी त्या स्वतंत्र गुन्ह्याचा व या प्रकरणाचा संबंध जोडू शकत नाही, असे स्पष्ट करत आरोपीना जामीन मंजूर केला.

Web Title:
संबंधित बातम्या