Home / News / नायगावची बीडीडी चाळ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल

नायगावची बीडीडी चाळ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल

मुंबई – नायगावच्या बीडीडी चाळीला महाविकास आघाडीचे सरकारअसताना शरद पवारनगर हे नाव देण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने आता हे...

By: Team Navakal

मुंबई – नायगावच्या बीडीडी चाळीला महाविकास आघाडीचे सरकारअसताना शरद पवारनगर हे नाव देण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने आता हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल असे नाव देण्याचा निर्णय घेतला. नायगाव बीडीडी चाळींना शरद पवारनगर असे नाव देण्याची घोषणा तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती त्यासोबत वरळीतील चाळींना बाळासाहेब ठाकरेनगर आणि डिलाइल रोड येथील चाळींना माजी पंतप्रधान राजीव गांधीनगर असे नाव देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला होता. आव्हाड यांच्या या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. येथील लोकप्रतिनिधींनीही राज्य सरकारला पत्र लिहून हे नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या