मुंबई -अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला गती देण्यावर चर्चा झाली आहे. तसेच टाटा मोटर्स, नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग, भारतीय जैन संघटना आणि मृद व जलसंधारण विभाग आणि एमआरएसए आणि आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार झाले.
या भेटीनंतर मकरंद अनासपुरे म्हणाले की, या भेटीत टाटा मोटर्स, नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. नाम ही संस्था आमची नाही, तर सर्वांची आहे. ही संस्थोला १० वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या १० वर्षांत १ हजारपेक्षा अधिक गावात आम्ही काम केले आहे. यंदा २३ जिल्ह्यात काम करणार आहोत. ही चळवळ लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली आहे. यात सरकार आम्हाला चांगली मदत करत आहे.
नाना पाटेकर म्हणाले की, नाम फाउंडेशनचे जलसंधारणचे काम आहे, त्या संदर्भात मंत्रालयात बैठक होती, सामुदायिकरित्या जलयात्रा करण्याचे नियोजन असून आम्हाला गावागावात जाऊन काम करायचे आहे.