नागपूर विमानतळ रोज बंद का ? उच्च न्यायालयाकडून दखल

नागपूर- नागपूर विमानतळ दररोज आठ तासांसाठी बंद ठेवले जात असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे. मार्च महिन्यापासून धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी हे विमानतळ दररोज ८ तास बंद ठेवण्यात येते . मात्र त्याकाळात काहीही काम होत नाही असे वृत्त एका स्थानिक वर्तमानपत्रात आले होते. उच्च न्यायालयाने या वृत्ताची दखल घेत स्वतःहून दखल घेण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी सुमोटो जनहित याचिका दाखल करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी एडव्होकेट कार्तिक शुकूल यांची न्यायालयाचे मित्र म्हणून नियुक्ती केली असून त्यांना या प्रकरणी रितसर जनहित याचिका नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून नागपूर विमानतळ हे दररोज ८ तास बंद ठेवण्यात येते. नागपूर सारखे देशाच्या मध्यवर्ती भागात असलेले विमानतळ बंद राहिल्याचा फटका अनेक प्रवाशांना बसतो. उच्च न्यायालयाने या संदर्भात विमानतळ प्रधिकरण व सरकारी वकीलांना नोटीस बजावून आपले म्हणणे मांडायला सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top