नागपूर – रामटेक तालुक्यातील घोटीटोक परिसरात 4 शालेय विद्यार्थी मोठ्या कालव्यात बुडाले. सर्व विद्यार्थी ७ ते ११ वी या इयत्तेत शिकणारे असून ते इंदिरा गांधी मुलांचे वसतीगृहाचे विद्यार्थी आहेत.बोरी गावाजवळ असलेल्या या वस्तीगृहाचे आठ विद्यार्थी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. आठपैकी चार विद्यार्थी तलाव्यात उतरले. मात्र तेव्हा कालव्यात पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे ते स्वत:ला सावरू शकले नाहीत आणि ते प्रवाहासोबत वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरु होते.
नागपुरात ४ विद्यार्थीकालव्यात बुडाले
