Home / News / नागपुरात हिट अँड रन! दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपुरात हिट अँड रन! दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपूर -नागपुरात हिट अँड रनची घटना घडली असून त्यात लँडरोवरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हुडकेश्वर येथे काल रात्री...

By: E-Paper Navakal

नागपूर -नागपुरात हिट अँड रनची घटना घडली असून त्यात लँडरोवरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हुडकेश्वर येथे काल रात्री ही दुर्घटना घडली. सॅम्युअल त्रिवेदी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो पेशाने पायलट होता. धंतोलीमधील एका मित्राला भेटून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहेत. दरम्यान या घटनेनंतर लँडरोव्हरचा चालक गाडी सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. मात्र पोलिसांनी सकाळी त्याला ताब्यात घेतले .

Web Title:
संबंधित बातम्या