नागपूर- नागझिरा अभयारण्यात सलग दुसऱ्या दिवशी वाघाचा मृतदेह आढळल्याने नागझिरा अभयारण्य प्रशासन हादरले आहे. नागझिराचा राजा अशी ओळख असणारा टी-९ हा वाघ काल मृतावस्थेत सापडला होता. तर आज सकाळी टी-४ या वाघिणीचा बछडा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.टी-९ उर्फ बाजीराव वयाच्या १२ व्या वर्षी वर्चस्वाच्या लढाईत मरण पावला. बाजीराव हा मूळ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोळसा वन परीक्षेत्रातील वाघ होता. डिसेंबर२०१६ मध्ये हा वाघ ताडोबावरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमण मार्गाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा जंगलात आला होता. तब्बल ९ वर्ष त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले. बाजीरावाच्या मृत्यूनंतर आज दुसऱ्या दिवशी टी-४ या वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह सापडला असून हा मृत्यूदेखील संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |