नांदेड – येथे ४ जणांचा खदानीत बुडून मृत्यू नांदेडजुन्या नांदेड मधील इतवारा आणि खुदबईनगर येथील पाच जण आज दुपारी झरी येथील खदानीत पोहण्यासाठी उतरले. पावसामुळे खदानीत भरपूर पाणी होते. त्यातच पाण्यात उतरलेल्या पैकी तिघांना पोहोता येत नव्हते. त्यामुळे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात यातील चौघांचा मृत्यू झाला. काझी मोजमिल, आफन, सय्यद सिद्दीकी आणि शेख फुझायल अशी मृतांची नावे आहेत. जीवरक्षक दल आणि नांदेड महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी या खदानीतून सर्व मृतदेह बाहेर काढले.