अर्धापूर – नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरवली आहे. चार विद्यमान संचालकांना डावलून तब्बल ८ नव्या चेहऱ्यानं संधी दिली आहे . यात काही आयाराम – गयाराम यांचाही समावेश आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून हे बदल करण्यात आले असल्याचे समजते.
काँग्रेसने बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान संचालक आणि माजी सभापती बी. आर. कदम पप्पू पाटील कोंढेकर,आनंदराव कपाटे ,अनिता क्षीरसागर, याना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या ऐवजी जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,ज्ञानेश्वर राजेगोरे, नीलकंठ मदने गायत्री कदम याना प्रथमच संधी देण्यात आली आहे. तर माजी सभापती शामराव पाटील टेकले एका निवडणुकीच्या ब्रेकनंतर उमेदवारी दिली आहे. भाजपातून स्वगृही परतलेले माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सदाशिव देशमुख,नीलेश देशमुख , गांधी पवार या नव्या जुन्यांच्या प्रयोगामुळे नाराजीचे सूर उमटत आहेत. याचा फटका अर्थातच महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील ५ बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असली तरी सर्वांच्या नजर मात्र नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत . कारण या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर आमने सामने आले आहेत
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक! काँग्रेसने ८ नव्या चेहऱ्याना संधी दिली
