नांदेड- नांदेड शहरालगत असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील तिरुमला ऑईल कंपनीला आग लागल्यामुळे परिसरात एकाच धावपळ उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.या कंपनीत काम करणारे कामगार आग लागल्याचे समजताच कंपनीच्या बाहेर पडले. या आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर या परिसरात पसरले होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्नानंतर काही तासांत आग विझवली. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे उघड झाले नाही.
नांदेड एमआयडीसीत कंपनीला आग
