Home / News / नव्या सरन्यायाधीश खन्नानी आपला ‘मॉर्निंग वॉक ‘ बंद केला

नव्या सरन्यायाधीश खन्नानी आपला ‘मॉर्निंग वॉक ‘ बंद केला

नवी दिल्ली- भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना हे उद्या सोमवार ११ नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहेत. पण त्यांच्याबाबत...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना हे उद्या सोमवार ११ नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहेत. पण त्यांच्याबाबत एक वेगळीच घटना समोर आली आहे.नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आपला मॉर्निंग वॉक थांबवला आहे.खन्ना हे दररोज सकाळी दिल्लीतील लोधी गार्डन परिसरात मॉर्निंग वॉक करायचे. पण आता ते सरन्यायाधीश होणार असल्याचे निश्चित झाल्याने त्यांना सरकारने एकट्याने मॉर्निंग वॉक करु नये असा सल्ला दिला आहे.
मॉर्निंग वॉक करताना त्यांनी प्रोटोकॉलनुसार आपल्या सुरक्षा टीमला सोबत ठेवावे लागेल. पण एवढ्या कारणासाठी सुरक्षा रक्षक सोबत घेऊन जाणे त्यांना योग्य वाटत नसल्याने त्यांनी आपला मॉर्निंग वॉकच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी राजधानी दिल्लीतूनच आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे. मॉडर्न स्कूलमधून त्यांनी शालेय तर सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी घेतली आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.

Web Title:
संबंधित बातम्या