Home / News / नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्या वाहतुकीत बदल

नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्या वाहतुकीत बदल

मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार...

By: E-Paper Navakal

मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात विविध राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपाचे दिल्लीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून त्यामुळे मुंबईतील अनेक महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत.
महापालिका मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकदरम्यान उद्या वाहतूक बंद असणार आहे. क. हजारीमल सोमानी मार्ग: चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक बंद करण्यात येणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद राहणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियमन लागू राहणार आहे.या काळामध्ये नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. शपथविधी सोहळ्याला येणाऱ्यांना पार्किंगबाबत महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या