दिसपूर- आसाममध्ये येत्या शैक्षणिक वर्ष २०२४ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी नव्या शैक्षणिक धोरणातंर्गत ही घोषणा केली.
आसाममध्ये १० वी इयत्तेची परीक्षा माध्यमिक शिक्षण मंडळ आसाम द्वारा घेतली जाते. तर १२ वी परीक्षा आसाम उच्च माध्यमिक शिक्षण परिषद द्वारा घेतली जाते. आता दोन्ही बोर्डांचे विलिनीकरण करण्यात आले आहे. १०व्या इयत्तेत आता केवळ पास आणि नापास हीच प्रणाली असेल. बोर्ड परीक्षा थेट बारावीला लागू असेल. १० परीक्षेत उत्तार्ण झालेल्या विद्यार्थ्यंना ११ वीत प्रवेश घेण्याची गरज भासणार नाही. नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी उत्तार्ण विद्यार्थी पुढच्या वर्गात म्हणजे ११ वीत जातील. दरम्यान, राज्यात ५+३+३+४ फॉर्म्युलावर आधारीत शिकवले जाईल. पहिली पाच वर्ष म्हणजे दुसरीपर्यंत प्ले ग्रुप असेल. त्यानंतर इयत्ता ३ ते इयत्ता ५वी पर्यंत प्राथमिक वर्ग असतील. त्यानंतर ६,७,८ वी असा एक टप्पा असेल तर चौथा टप्पा नववी ते १२ बारावी पर्यंत असा असेल.
नव्या शैक्षणिक धोरणातंर्गत आसाममध्ये १० वी बोर्ड रद्द
