Home / News / नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना ?

नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना ?

नवी दिल्ली – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर रोजी संपत असून आपला उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीशपदी न्या. संजीव खन्ना...

By: netadmin
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर रोजी संपत असून आपला उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीशपदी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची त्यांनी शिफारस केली आहे. चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहून खन्ना यांचे नाव सूचविले आहे.न्या. संजीव खन्ना हे चंद्रचूड यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांची शिफारस केंद्र सरकारने मान्य केल्यास न्या. संजीव खन्ना हे देशाचे ५१ वे सरन्यायाधीश ठरणार आहेत. त्यांचा कार्यकाळ १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असेल.न्या.खन्ना १९८३ मध्ये बार कौन्सिलचे सदस्य झाले होते.सुरुवातीला त्यांनी जिल्हा न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून काम केले.त्यांनंतर दिल्ली उच्च न्यायालयात आणि न्यायिक लवादांमध्ये त्यांना काम केली.१८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली होती.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या