नवी मुंबई विमानतळावर आज सुखोई विमानाची उड्डाण चाचणी

नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या सुखोई जेट लढाऊ विमान उड्डाण करणार आहे.उद्या दुपारी ३ ते ४ या कालावधीत सुखोई एसयू-३० एमकेआय हे लढाऊ विमान पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर उतरेल आणि काही वेळाने उड्डाण करेल. त्याचप्रमाणे गुजरातच्या गांधीनगरहून सी-२९५ हे लष्कराचे विमान या विमानतळावर उरविण्यात येणार आहे.एका महिन्यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नवी मुंबई विमानतळाची इन्स्ट्रुमेंट लँडिंग टेस्ट ही अत्यंत महत्वाची चाचणी घेतली होती. ती यशस्वी झाल्यानंतर ही विमाने या विमानतळावर उतरविण्यात येणार आहेत.या विमानतळाचे उद्घाटन ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते पुढे ढकलण्यात आले.उद्या होणाऱ्या सुखोईच्या उड्डाण चाचणीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top