नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज प्रथमच विमानाच्या सिग्नलची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी या विमानतळाच्या धावपट्टीवर विमान आणले. त्यावेळी हे विमान पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.धावपट्टीवर विमान उतरताना किंवा उड्डाण घेताना कोणता अडथळा येत नाही, याची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने विमानतळावरच्या धावपट्टीवर सिग्नल यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी अनेक लोकांनी मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली होती आणि लोकांनी टाळ्या वाजवत या विमानांचे स्वागत केले. या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठवण्यात आला.