नवी मुंबई- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले.गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली.आवक कमी झाल्यामुळे बाजारात लसणाचा भाव वाढला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एपीएमसी बाजारपेठेत सध्या लसणाचे दर ३०० ते ३५० किलोपर्यंत पोहोचले आहेत.
सोलापुरासह अकलूजमध्येही लसणाची आवक कमी झाली आहे. परिणामी अकलूज बाजारात २० हजार रुपये क्विंटल आणि सोलापूर बाजारात २५ हजार ८०० रुपये क्विंटल दर मिळाला.छत्रपती संभाजीनगर बाजारात लसणाला १९ हजार ५०० रुपये, चंद्रपूर -गंजवड बाजारात ३० हजार रुपये,राहता बाजारात २६ हजार रुपये,अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल लसणाला २५ हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये २२ हजार ५०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे.