नवी मुंबई – खारघर येथे आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराची उभारणी झाली आहे. उद्या १५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून या मंदिराचे बांधकाम सुरु होते. भगवान श्रीकृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर असे नाव ठेवले असून, त्याचे बांधकाम संगमरवरी दगडात व ९ एकर च्या परिसरात केले आहे. याठिकाणी सभागृहात भगवान श्रीकृष्णाच्या लीलांना थ्रीडी फोटोंच्या आधारे दाखवण्यात येणार आहे. हे या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या इस्कॉन मंदिराचा उद्घाटन समारंभ ९ जानेवारीपासून सुरू झाले. हा सोहळा १५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी विशेष धार्मिक कार्यक्रम व यज्ञ विधी आयोजित केले आहेत.
नवी मुंबईत आशियातील मोठे इस्कॉन मंदिर
