नवाब मालिकांच्या न्यायालयीन
कोठडीत १४ दिवसांची वाढ

मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून ही वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी किडनी विकार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्यांनी अर्ज केला होता. जामिनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र दहशतवादी फंडिंग केला गेल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कुख्यात आरोपी आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी दाऊदसोबत कथित गरव्यवहार केला, असा आरोप करण्यात आला आहे.
नवाब मलिक यांची तब्येत पाहता त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.त्यामुले न्यायालयात हजर राहण्यापासून मलिक याना न्यायालयाकडून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तब्येतीचे कारण सांगून त्यांना जमीन मिळावा म्हणून त्यांच्या वकिलाने अर्ज केला आहे. मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केला नाही. न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी वाढवली आहे. न्यायधीश राहुल रोकडे यांच्या विशेष पीएमपीएलए कोर्टात आज सुनावणी झाली. ईडीकडून मलिक यांच्या गैरव्यवहार केल्याचे पुरावे असल्याचा दावा केल्यामुळे त्यांना जमीन देता काम नये असे म्हटले आहे. त्यामुळे यावर त्यांना १४ दिवसांची कोठडी वाढवण्यात आली असून, १७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Scroll to Top