Home / News / नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रवाहित

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रवाहित

धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा आज प्रवाहित झाला आहे. परिणामी किल्ल्यात पर्यटकांची...

By: E-Paper Navakal

धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा आज प्रवाहित झाला आहे. परिणामी किल्ल्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक हे दोन्ही धबधबे सुरु झाले नव्हते. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची निराशा झाली होती. मात्र यावर्षी बोरी धरण पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस चांगला झाल्याने नळदुर्ग येथील बोरी धरण काल पूर्ण क्षमतेने भरून धरणाचा सांडवा सुरु झाला होता. या सांडव्याचे पाणी पुढे बोरी नदीत गेले. या नदीवरील किल्ल्यातील शिलक आणि नर-मादी हे दोन्ही धबधबे प्रभावित झाले.

Web Title:
संबंधित बातम्या